एसबीआयमध्ये मेगा भरती, ६३४८ जागा भरणार

बेरोजगार तरूणासाठी खूशखबर आहे. स्टेट बॅक ऑफ इंडियाने (एसबीआय) तब्बल ६३४८ जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. यानुसार अप्रेंटीस या पदाच्या जागा संपूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात ३९० जागा भरण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करायचे असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२१ आहे.

शैक्षणिक पात्रता 

अप्रेंटीस उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर असावा.

वयोमर्यादा

३१ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. SC/ST उमेदवारांना ५ वर्षांची सूट असेल, तर OBC उमेदवारांना ३ वर्षांची सूट असेल. 

निवड प्रक्रिया 

लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांची परीक्षा ऑगस्ट २०२१ मध्ये घेतली जाईल.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा पत्ता - ibpsonline.ibps.in

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - २६ जुलै २०२१

अधिकृत संकेतस्थळ - www.sbi.co.in

नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना एक वर्षांपर्यंत १५००० रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. या उमेदवारांना इतर भत्ते आणि बॅनेफिट्सचा देखील फायदा मिळणार आहे.



हेही वाचा -

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  1. महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
पुढील बातमी
इतर बातम्या