Advertisement

महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर

कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्रात 'इथं' साकारलं जातंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्यदिव्य मंदिर
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील मराडे पाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारण्यात येत आहे. शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) संकल्प केला गेला आहे.

२०१८ मध्ये या मंदिराचे भूमिपूजन होऊन या कामाचा शुभारंभ झाला. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात अनेक अडचणींचा सामना करत या मंदिराचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

या मंदिराची रचना किल्ल्याच्या तटबंदी सारखी आहे. त्यामध्ये भव्य मंदिर उभारणे सुरू असून तटबंदीच्या आतील बाजूस ४० कप्पे आहेत. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र ऐतिहासिक शिल्पाच्या माध्यमातून साकारलं जाणार आहे.

काही तरी वेगळे करण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या मनात ही संकल्पना आली. त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर उभारण्याचं ठरवलं. त्यासाठी शिव प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत जागा खरेदी केली. स्थानिक लोकांनी देखील यासाठी भरपूर मदत केली.

सध्याच्या तरुणांना शिवचरित्राची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन आणि त्यांच्या काळात असणाऱ्या कला तसंच त्यांचे गुण हे तरुणांना गरजेचे आहेत. त्यासाठी हे मंदिर त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी दानपट्टा सारखे अनेक स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना या मंदिराचा पुरेपूर फायदा होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर हे आमच्या गावात होत आहे याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे. आमचं गाव हे थोड्याच कालावधीत पूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध झालं आहे. या अगोदर आमच्या गावाला कुठेही ओळख नव्हती. मंदिरामुळे गावचा विकास देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. या मंदिरामुळे आमच्या गावातून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज हे जवळून पाहायला मिळणार आहेत. महाराजांचा संपूर्ण इतिहास हा तरुणांना समजणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.



हेही वाचा

ठाण्यात 'इथं' सुरू होणार तरंगतं हॉटेल

मुंबईतील मालमत्ता नोंदणीत जून २०२१ मध्ये चार पट वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा