Advertisement

मुंबईतील मालमत्ता नोंदणीत जून २०२१ मध्ये चार पट वाढ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात घरविक्री तसंच मुद्रांक शुल्क वसुलीत मोठी घट झाली.

मुंबईतील मालमत्ता नोंदणीत जून २०२१ मध्ये चार पट वाढ
SHARES

मुंबईतील मालमत्ता विक्रीत जून २०२१ मध्ये तब्बल चार पट वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात घरविक्री तसंच मुद्रांक शुल्क वसुलीत मोठी घट झाली. मात्र, लााॅकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच मुंबईत घर विक्री वेगाने वाढली आहे. 

रिअल इस्टेट कन्सल्टंट्स नाईट फ्रँक इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मुंबई आणि उपनगरी भागात जून २०२० मध्ये १८३९ मालमत्तांची नोंदणी झाली होती. जून २०२१ मध्ये हा मालमत्ता नोंदणींचा हा आकडा तब्बल ७८५७ वर गेला आहे. तसंच जून २०२१ मध्ये घरांची विक्री ही जून २०१९ च्या तुलनेत ३९ टक्के अधिक राहिली आहे. 

राज्यात मे महिन्यामध्ये ६६ हजार ५३४ तर जूनमध्ये १ लाख ४५ हजार ३४९ घरांची विक्री झाली आहे. या घर विक्रीतून मे महिन्यात सरकारला ८१४ कोटी रुपयांचा तर जूनमध्ये १४९४ कोटींचा महसूल मिळाला आहे.

मार्च २०२० नंतर लागलेल्या लाॅकडाऊनमुळे घर विक्री मोठी घटली होती. एप्रिल 2020 मध्ये केवळ  ७७७ घरं विकली गेली होती.  त्यानंतर राज्य सरकारने घर विक्रीला चालना देत महसूल वाढवण्यासाठी सप्टेंबर ते ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के सवलत दिली. त्यामुळे घर विक्री वाढून सरकारला २४६४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.  मार्च २०२१ मध्ये राज्यात २ लाख १३ हजार ४१३ घरे विकली गेली.हेही वाचा-

जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज

बापरे! लसीकरण शिबिरांत सलाइन वॉटरचा वापर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा