महिलांसाठी एनटीपीसीमध्ये खास भरती, 'इतक्या' जागा भरणार

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (एनटीपीसी) महिलांसाठी खास भरती केली जाणार आहे. एकूण ५० जागा यामध्ये भरल्या जाणार आहेत.  इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर,  इलेक्ट्रॉनिक्स  इंजिनिअर आणि इंस्ट्रुमेंटेशन आदी पदं भरली जाणार आहेत. 

पात्र आणि इच्छुक उमेदवार ६ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीत इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या २२ जागा, मेकॅनिकल या पदासाठी १४ जागा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन या पदासाठी १४ जागा अशा एकूण ५० जागा भरल्या जाणार आहेत.  ही फक्त महिलांसाठी विशेष भरती आहे.

 शैक्षणिक पात्रता

१) ६५ टक्के गुणांसह संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी [ एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी: ५५ टक्के गुण] (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र) 

२) जीएटीई २०२१ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १८ ते २७ वर्षे असावं.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.ntpc.co.in/en वर उमेदवार संपर्क करू शकतात.



हेही वाचा -

रेल्वेच्या 'त्या' शूर कर्मचाऱ्याला जावा कंपनीकडून ही खास भेट

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन


पुढील बातमी
इतर बातम्या