Advertisement

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन

मुंबई आणि उपनगरातील अनेक मशिदींनी कोविड १९ रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील मशिदी कोरोना रुग्णांना पुरवत आहेत मोफत ऑक्सिजन
SHARES

मुंबई आणि उपनगरातील अनेक मशिदींनी कोविड १९ रूग्णांना ऑक्सिजन सिलिंडर देण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे. ज्या COVID 19 रूग्णांची ऑक्सिजन पातळी खूपच कमी आहे अशांसाठी ही सेवा घरी पुरवली जात आहे.

रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेनं सुरू केलेल्या सेवे मार्फत मुंबईतील मुंब्रा, मीरा रोड, कल्याण आणि भिवंडी अशा अनेक मशिदींद्वारे ऑक्सिजन सिलिंडर पुरवले जात आहेत.

“सर्व कोविड -१९ रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्यामुळे आणि बर्‍याच जणांवर घरी उपचार केले जात असल्यानं, ज्यांना गरज आहे त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा आम्ही विचार केला. हे लोक कोणत्याही धर्माचे, जातीचे असोत, त्यांना ऑक्सिजन विनामूल्य प्रदान केला जात आहे. हा कोरोनाविरोधात एक संयुक्त लढा आहे,” असं रेड क्रिसेंट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरशद सिद्दीकी म्हणाले.

मागणी वाढत आहे आणि त्यांची स्वयंसेवी संस्था कदाचित ती पूर्ण करू शकणार नाही, असं सिद्दीकी म्हणाले. या कामात त्यांनी मशिदींचा सहभाग का निवडला आहे असं विचारलं असता ते म्हणाले की, दिवसातून केवळ पाच वेळा प्रार्थना करण्यासाठी मशिदिचा वापर केला जाऊ नये.

“हे देवाचे घर आहे, एक पवित्र स्थान आहे आणि आम्हाला वाटते की एखाद्या पवित्र जागेपासून एक चांगला उपक्रम सुरू झाला पाहिजे. आम्हाला सर्व समुदायाकडून विनंत्या येत आहेत,” असं सिद्दीकी म्हणाले. यांची स्वयंसेवी संस्था यापूर्वी बांगलादेशातील रोहिंग्यांच्या त्सुनामी आणि शरणार्थी शिबिरांमध्ये भूकंपग्रस्तांच्या मदतीस पुढे आली होती.

घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी ऑक्सिजनच्या व्यवस्थेमध्ये स्वयंसेवा करणारे कार्यकर्ते डॉ. अजीमुद्दीन म्हणाले की, "आतापर्यंत एक हजार सिलिंडरचे वितरण केले गेले आहे. वेळेत ऑक्सिजन मिळत नसल्यानं बरेच लोक मरत आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रूग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून परत पाठवलेलं मी पाहिलं आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा केल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.”

कारखाना पुरवठा रोखू शकला नाही तर अधिक मशिदींचा या उपक्रमात प्रवेश केला जाईल, असं डॉ. अजीमुद्दीन यांनी सांगितलं. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी रुग्णालयांना प्राधान्य दिलं जात आहे. परंतु हे देखील महत्वाचं आहे की, लोकांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.



हेही वाचा

केंद्र सरकारनं रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले

कोरोना लसीची नासाडी करण्यात तामिळनाडू अव्वल, महाराष्ट्र 'या' क्रमांकावर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा