Advertisement

केंद्र सरकारनं रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले

यामुळे इंजेक्शनचं देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यात आणि तुटवडा कमी करण्यात मदत होणार आहे.

केंद्र सरकारनं  रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले
SHARES

केंद्र सरकारनं रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले (Import Duty Free) आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या इंजेक्शनासाठी लागणाऱ्या औषधी सामग्रीवरील आयात (imports of Remdesivir API) शुल्क हटवण्यात आले आहेत. यामुळे इंजेक्शनचं देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यात आणि तुटवडा कमी करण्यात मदत होणार आहे.

सरकारनं मंगळवारी रेमडेसिवीर, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल आणि ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर घटकांचे सीमा शुल्क माफ केले आहेत.

महसूल विभागानं जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, केंद्र सरकारनं ज्या वस्तूंवर शुल्क माफ केलं आहे त्यात रेमेडिसवीर, रेमेडिसवीर इंजेक्शन्स आणि बीटा सायक्लोडोडक्स्ट्रिनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य (एपीआय) यांचा समावेश आहे. आयात शुल्कात ही सूट ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहील.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट केलं आहे, की कोरोनाच्या उपचारात प्रभावी मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाच्या (Remdesivir API) आयातीवर कोणतीही फी आकारली जाणार नाही. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनची आयातही शुल्कमुक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेनं हे औषध येत्या काळात देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं, की भारत सरकार रेमडेसिवीरचं उत्पादन वाढवण्याचा आणि ते कमी किमतीत उपलब्ध करुन देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.


हेही वाचा

परदेशी कोरोना लसीवरील १० टक्के कस्टम ड्युटी माफ होणार?

कोरोना लसीची नासाडी करणात तामिळनाडू अव्वल, महाराष्ट्र 'या' क्रमांकावर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा