Advertisement

पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्र

पोलीस दलानं अधिकारी, अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी कलिना, कोळे कल्याण वसाहतीत सुसज्ज कोरोना उपचार केंद्र सुरू केलं आहे.

पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्र
SHARES

मुंबईत कोरोना प्रचंड वाढत असून, याचा ताण मुंबई पोलिसांवर पडत आहे. कोरोनाकाळात कडक निर्बंध लावण्यात आल्यानं त्यांना दिवसरात्र कार्य करावं लागत आहे. परिणामी पोलिसांच्या तब्येतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांसाठी सुसज्ज कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. 

पोलीस दलानं अधिकारी, अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी कलिना, कोळे कल्याण वसाहतीत सुसज्ज कोरोना उपचार केंद्र सुरू केलं आहे. या केंद्रात एकूण २५६ खाटा आहेत. त्यापैकी २८ प्राणवायू खाटा (ऑक्सिजन बेड्स) आहेत. विशेष म्हणजे या केंद्रातील ५० खाटा महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

मंगळवारी केंद्र सुरू झाले. पहिल्याच दिवशी २ अधिकारी आणि सहा अंमलदारांना केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी पोलीस दलात संसर्ग प्रसार वेगाने वाढू लागल्यानंतर कोळे कल्याण पोलीस वसाहतीतील अधिकाऱ्यांच्या निवासासाठी उभारलेल्या इमारतीत अशा प्रकारचे केंद्र उभारण्यात आले होते.

मात्र लक्षणं नसलेल्या किंवा अगदीच किरकोळ स्वरूपाची कोरोनाची बाधा असलेल्यांवर या केंद्रात उपचार करण्यात आले. हे केंद्र अन्य इमारतीत सुरू करण्यात आले असून त्यात ५८ वर्षे वयापर्यंत, सहव्याधी असलेल्यांनाही उपचार मिळतील.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा