CSMT, एलटीटी, दादर स्थानकांवर 10 जलशुद्धीकरण युनिट्सची स्थापना

Image: Picture of 750 LPH capacity water purification unit installed at PF-14/15, CSMT, Mumbai
Image: Picture of 750 LPH capacity water purification unit installed at PF-14/15, CSMT, Mumbai
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

BARC ने भारतातील अनेक भागांमध्ये जल तंत्रज्ञानावर आधारीत एक प्रकल्प तयार केला आहे. तसेच सर्वसामान्यांना पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध करून दिले आहे. या प्रकल्पांतर्गत, 10 BARC तंत्रज्ञानावर आधारित जल शुध्दीकरण युनिट (750/500 LPH क्षमता) स्थापित केले गेले आहेत.

मध्य रेल्वेच्या या स्थानकांवर (CR) - CSMT येथे 750 LPH क्षमतेचे 3 युनिट्स ठेवले जातील. LTT येथे 500 LPH क्षमतेची 4 युनिट्स, दादर येथे 500 LPH क्षमतेचे 2 युनिट आणि डॉकयार्ड रोड येथे 750 LPH क्षमतेचे 1 युनिट आहे.

BAC, Rमुंबई आणि CR च्या मुंबई विभागादरम्यान 6 जानेवारी, 2023 रोजी स्वाक्षरी झालेल्या करारनाम्यानुसार (MOA) आता 10 युनिट्स प्रवाशांच्या वापरासाठी 27 जानेवारी 2024 रोजी रेल्वे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. MOA नुसार, पुढील एक वर्षासाठी युनिट्सची नियमित देखभाल BARC तंत्रज्ञान परवानाधारकाद्वारे केली जाईल. 

या संदर्भात, DAE, सचिव डॉ. अजित कुमार मोहंती यांनी नमूद केले की, भारत सरकारने सुरू केलेल्या जल जीवन मिशनच्या अनुषंगाने, DAE ने ग्रामीण भागात खारे आणि समुद्राचे पाणी विलवणीकरण तसेच जल शुद्धीकरण तंत्रज्ञान लागू केले आहे. 


हेही वाचा

टाटा पॉवर कंपनीचा वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव

मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीला सुरू होण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या