Advertisement

मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीला सुरू होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत.

मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा 9 फेब्रुवारीला सुरू होण्याची शक्यता
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 फेब्रुवारीला मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा रस्ता वांद्रे वरळी सी लिंकला मरीन ड्राइव्हशी जोडेल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्घाटनाची घाई भाजप करत आहे की काय अशी चर्चा रंगली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 फेब्रुवारीला दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईच्या किनारी भागाचे उद्घाटन करतील अशी अपेक्षा आहे. वांद्रे वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हला जोडणारा किनारी रस्ता हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प आहे.

वरळी ते मरिन ड्राइव्ह या दक्षिणेकडील मार्गाचे उद्घाटन, वरळी वांद्रे सीलिंकपर्यंतचा पूल नंतर बांधण्यात येणार आहे. या भूमिपूजनाची आखणी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी केली होती, आता भाजप लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्घाटनाची घाई करत आहे, असे आरोप होत आहे. 

कोस्टल रोडवरील वरळी ते मरीन ड्राईव्ह या दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्यावरील मार्गावर वाहतूक सुरु झाल्यानंतर सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 असे केवळ 12 तासच वाहतुकीला परवानगी असणार आहे. उरलेल्या वेळात कोस्टला रोडचे बाकीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासोबत एकूण कोस्टल रोड सुरु जून 2024 पर्यंतचा वेळ जाणार आहे. शिवडी नाव्हा शेवा सेतूचे शिवडी ते वरळीपर्यंत खांब उभारण्याचे काम सुरु असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे 84 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 9 किलोमीटरचा चारपदरी मार्ग फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणार आहे. या मार्गावर ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने गाड्या धावणार आहेत.

त्यामुळे वाहने, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोस्टल रोडवर एन्ट्री, एक्झिट आणि बोगद्यासह 24 सीसीटीव्ही कॅमेरे, 30 व्हिडीओ इन्सिडंट डिटेक्शन सिस्टीम आणि भुयारी मार्गावर प्रत्येक 100 मीटरवर 80 आपत्कालीन फोन यंत्रणा उपलब्ध करुण देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ आणि इंधन वाचवणाऱ्या कोस्टल रोडच्या दक्षिण मुंबईतून थेट वरळीत घेऊन येणारा, प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा 10.58 किमीचा पहिला टप्पा फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.



हेही वाचा

ऐरोली-कळवा दरम्यान नवीन रेल्वे कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात

कोस्टल रोड जानेवारीच्या अखेरीस अंशत: उघडण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा