Advertisement

कोस्टल रोड जानेवारीच्या अखेरीस अंशत: उघडण्याची शक्यता

टोल-फ्री मुंबई कोस्टल रोड प्रकल्प 85% पूर्ण झाला आहे.

कोस्टल रोड जानेवारीच्या अखेरीस अंशत: उघडण्याची शक्यता
SHARES

उद्यान, सायकल ट्रॅक, नाट्यगृह, जॉगिंग ट्रॅक अशा सोयीसुविधा कोस्टल रोड प्रकल्पात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोस्टल रोड प्रकल्पात मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर वरळी सी-फेस येथे लॅडस्कपिंग केले असून, येथून अथांग समुद्राचा आनंद लुटता येणार आहे.

कोस्टल रोडचे 84.8 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे थडानी जंक्शन वरळी ते मरीन लाइन्स दरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खुल्या करण्यात येणाऱ्या एका मार्गिकेचा शुभारंभ होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे- वरळी सी- लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे.

कोस्टल रोड प्रकल्पात दोन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. चार मजली इमारतीची उंची असणार्‍या 'मावळा' टनेल बोअरिंग मशिनने 2.072 किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात आले आहेत. सद्यस्थितीत 84.8 टक्के काम फत्ते झाले असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थडानी जंक्शन वरळी ते मरीन लाइन्स दरम्यान, एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पात महालक्ष्मी मंदिराच्या मागून थेट कोस्टल रोडची सफर करता येणार आहे.



हेही वाचा

मुलुंडमधील महाराणा प्रताप चौकात मेट्रोला जोडणारा स्कायवॉक उभारण्यात येणार

JVLR ब्रिज 23 फेब्रुवारीपर्यंत अंशतः बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा