मुंबईत येताय, तर १४ दिवस क्वाॅरंटाईन बंधनकारक, महापालिकेने आदेशच काढला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेक जण मुंबई सोडून गावी परतले होते. मात्र, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देशातील विविध राज्यातून मुंबईत परप्रांतीयांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने बाहेरून येणाऱ्या लोकांना घरातच १४ दिवस क्वाॅरंटाईन व्हावं लागेल असे आदेश दिले आहेत. 

मुंबईतील कोरोना नियंत्रणात आला असला तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये म्हणून पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. आता गावाहून मुंबईत परतणाऱ्या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत दाखल झालेले शासकीय अधिकारी ओळखपत्र दाखवून क्वारंटाईनपासून सुटका मिळवत आहेत. ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या गावी परतले आहेत. आता काही लोक पुन्हा परत येत असल्याने महापालिकेने नवीन नियम जाहीर केले आहेत.


हेही वाचा

तर, मुंबईच काय जगातलं कुठलंही शहर तुंबेल, महापालिका आयुक्तांचा दावा

Mumbai Rains : पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड


पुढील बातमी
इतर बातम्या