Advertisement

Mumbai Rains : गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड

गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं तर आता ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे.

Mumbai Rains : गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं मोडला ४६ वर्षांचा रेकॉर्ड
SHARES

मुंबईसह उपनगरात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू झाला. बुधवारी दुपारी दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक होता. गेल्या १२ तासात पडलेल्या पावसानं तर आता ४६ वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे.

कुलाबा वेधशाळेनं गेल्या १२ तासात २९३.८ मिमी पावसाची नोंद केली आहे. ऑगस्टमध्ये गेल्या २४ तासात पडलेल्या पावसानं उच्चांक गाठला आहे. १९७४ नंतर इतका पाऊस कोसळला असेल. त्यामुळे कुलाबचा ४६ वर्षांचा रेकॉर्ड यावर्षी तोडला आहे.

हवामान खात्यानं बुधवारी सांताक्रुझमध्ये १२ तासात १०३ मिमी पावसाची नोंद केली. तर काही भागांमध्ये ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढचे काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिकांनी घरातच राहावे. सुरक्षित राहावे, असं आवाहन पोलीस आयुक्त, प्रशासन आणि मंत्र्यांनी केलं आहे.

मुसळधार पावसामुळे वाहतुक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे मंत्रकाय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ आणि न्यायालयाचा परिसर जलमय झाला होता. अनेक झाड उन्मळून पडली आहेत. अशात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसांन जनजिवन विस्कळीत झालं असलं तरी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी देखील आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव पूर्णपणे भरलं आहे. मुंबईला या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होतो. सध्या हा तलाव भरला असल्यानं मुंबईकरांवरील पाण्याचं संकट टळलं आहे.   



हेही वाचा

Mumbai Rains : लँडस्लाईडमुळे पेडर रोड वाहतुकीसाठी बंद

NDRF ची टीम होडी घेऊन रेल्वे रुळावर, अडकलेल्या प्रवाशांना काढले बाहेर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा