Advertisement

Mumbai Rains : लँडस्लाईडमुळे पेडर रोड वाहतुकीसाठी बंद

लँडस्लाईडची ही मुंबईतील दुसरी घटना आहे. मंगळवारी कांदिवली इथं देखील डोंगराचा काही भाग धासळला होता.

Mumbai Rains : लँडस्लाईडमुळे पेडर रोड वाहतुकीसाठी बंद
SHARES

मुंबईत गेले ३ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी अनेक झाडं देखील पडली आहेत. यात अनेक गाड्यांचं नुकसान झालं आहे. तर रात्री पेडर रोडवर देखील लँडस्लाईड झालं आहे.

मुंबईकर साखर झोपेत असताना प्रसिद्ध असलेला पेडर रोड मुसळधार पावसानं खचला आहे. रस्त्यावर झाडं उन्मळून पडली असून मातीचा ढीगही रस्त्यावर आला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रस्त्यावर उन्मळून पडलेली झाडं आणि मातीचा ढीग हटवण्यात अडथळे येत आहे.

मुंबईतील पेडर रोड वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आला असून रस्त्यावर आलेला मातीचा मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याला तडे गेल्याचंही पाहायला मिळालं.

हेही वाचा : Mumbai Rains : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद, या मार्गावरून वळवली वाहतूक

लँडस्लाईडची ही मुंबईतील दुसरी घटना आहे. मंगळवारी कांदिवली इथं देखील डोंगराचा काही भाग धासळला होता. त्यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नव्हती. परंतु. तो मार्ग सध्या बंद ठेवण्यात आला आहे. त्या मार्गावरील दगड, माती साफ करण्याचं काम सुरू आहे. याशिवाय तो डोंगर देखील धोकादायक असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान गेले ३ दिवस पडणाऱ्या पावसानं सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेले ४६ वर्ष असा पाऊस मुंबईत झाला नाही. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. ३००  मिमीच्या वर पाऊस झाला आहे. या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. दोन लोकल ट्रॅकवरच थांबल्याने त्यातले सर्व प्रवासी तिथेच अडकले. ट्रॅकवर पाणी चढत गेलं आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी NDRF ला पाचारण करण्यात आलं.

गुरुवारी देखील मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पालिका आणि पोलिसांनी केलं आहे.हेही वाचा

NDRF ची टीम होडी घेऊन रेल्वे रुळावर, अडकलेल्या प्रवाशांना काढले बाहेर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण भरले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा