Advertisement

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण भरले

बोरिवली नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलाव भरला आहे. यामुळे मुंबईकरांवरचे पाणी संकट टळणार आहे.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मुंबईला पाणीपुरवठा करणारे आणखी एक धरण भरले
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या तलावानंतर ‘विहार तलाव’ आता ओव्हरफ्लो झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांपैकी विहार हे तलाव आहे. दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव बुधवारी रात्री १० च्या सुमारांस ओसांडून वाहू लागले. काही दिवसांपूर्वीच म्हणजे २७ जुलै रोजी तुळशी तलावातील पाणी ओव्हरफ्लो झाले होते.

हेही वाचाः- मध्य रेल्वेची मेन, हार्बर वाहतूक ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी आली एनडीआरएफ

बोरिवली नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलाव भरला आहे. यामुळे मुंबईकरांवरचे पाणी संकट टळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी एक विहार तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याआधी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव भरला होता. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ दिनांक ०५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर पाण्याची क्षमता असणारा हा तलाव मागच्यावर्षी दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

हेही वाचाः- Mumbai Rains: घराबाहेर पडू नका! मुंबईकरांसाठी पोलिसांचा अलर्ट

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा