Advertisement

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव भरलं

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तुळशी तलाव भरलं
SHARES

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव काठोकाठ भरला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात मागील दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही हजेरी लावल्यानं तुळशी तलाव भरला आहे.

पाणी पातळीत वाढ

मुंबईला ७ तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यामधील तुळशी तलाव भरलं आहे. या तलावाच्या पाणीसाठ्याची क्षमता १३९.१७ मीटर इतकी असून, शुक्रवारी सकाळी या तलावानं १३७.१० मीटर एवढी पाणी पातळी गाठली. मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा केला जातो. सध्या तलावात ६ लाख ३५ हजार ६५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.

दिलासादायक ठरणार का?

मुंबई आणि पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्र परिसरात असाच पाऊस सुरू राहिला तर, मुंबईत सुरू असलेली दहा टक्के पाणी कपात रद्द होऊ शक्याता आहे. त्यामुळं यंदाच्या पावसाळा मुंबईकरांना दिलासादायक ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तलावांमधील पाणीसाठा

  • अप्पर वैतरणा – ५८५०९
  • मोडक सागर – १०५८७८
  • तानसा – ९८४४३
  • मध्य वैतरणा – १२३९२३
  • भातसा – २८४१७२
  • विहार – १५२९६
  • तुलसी – ७९४४
  • एकूण – ६,३५,६५९हेही वाचा -

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी होणार जाहीर

मुंबईचे डबेवाले शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टीवरRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा