Advertisement

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी होणार जाहीर

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण शुक्रवारी संंध्याकाळी ६ वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता जाहीर होणार आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी होणार जाहीर
SHARES

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण शुक्रवारी संंध्याकाळी ६ वाजता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता जाहीर होणार आहे. यादी जाहीर झाल्यानंतर यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय ज्या विद्यार्थ्यांना मिळाले, त्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन १३ ते १५ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे.

वाणिज्य शाखेला प्राधान्य

१ लाख ८५ हजार ४७३ विद्यार्थी मुंबई विभागातून गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरले आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १ लाख १७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला प्राधान्य दिलं आहे. तसंच, ४९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि १७ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिल्याचं समजतं.

कोटानिहाय जागाही होणार जाहीर

अकरावी प्रवेशाच्या कोटानिहाय जागाही शुक्रवारी जाहीर होणार असल्याची समोर येत आहे. अकरावी प्रवेशादरम्यान खुल्या वर्गाशिवाय इनहाउस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक अशा कोट्यातून प्रवेश होत असल्यानं या जागांची माहिती विद्यार्थी, पालकांना उपलब्ध झाल्यास प्रवेशाच्या वेळी मदत होते. मात्र, अद्याप त्या जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळं या जागा देखील शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहेत.हेही वाचा -

'पावती घ्या, मगच पैसे द्या', मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहन

नाल्यात पडलेल्या २ वर्षीय मुलाचा अद्याप तपास सुरूचसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा