Advertisement

'पावती घ्या, मगच पैसे द्या', मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे स्थानकांवरील स्टॉलधाराकांकडून घेण्यात आलेली वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं नवा उपक्रम सुरू केला आहे. 'नो बिल, नो पेमेंट' हा उपक्रम मध्य रेल्वेनं सुरू केला आहे.

'पावती घ्या, मगच पैसे द्या', मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहन
SHARES

मध्य रेल्वे स्थानकांवरील स्टॉलधाराकांकडून घेण्यात आलेली वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं नवा उपक्रम सुरू केला आहे. 'नो बिल, नो पेमेंट' हा उपक्रम मध्य रेल्वेनं सुरू केला असून, या उपक्रमानुसार प्रवाशांनी विक्रेत्याकडून पावती घेतल्याशिवाय पैसे द्यायचे नाहीत. पावती दिली नाही, तर संबंधित विक्रेत्यावर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेनं प्रत्येक स्थानकावरील स्टॉलवर 'नो बिल, फूड फ्री' असॆ फलक लावण्याची सक्ती विक्रेत्यांना केली आहे.

खाद्यपदार्थांची विक्री

रेल्वे स्थानकावर अनेक जण मनमानीपणं खाद्यपदार्थांची विक्री करतात. विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांवर अधिक दर आकारले जात असल्यानं ग्राहकांचा खिसा कापला जातो. त्यामुळं या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं ही उपक्रम सुरू केला आहे.

ग्राहक हिताचा निर्णय

याआधी अनेकदा ग्राहकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या या तक्रारींची मध्य रेल्वेनं दखल घेतली आहे. तसंच, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पावती घ्या मगच पैसे द्या, असा ग्राहक हिताचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला.दरम्यान, लांब पल्ल्यांंच्या मेल, एक्स्प्रेसमधून अधिकृत विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी केल्यास आता कार्ड किंवा आॅनलाइन बँकिंग सुविधेद्वारे व्यवहार करता येणार आहे.



हेही वाचा -

नाल्यात पडलेल्या २ वर्षीय मुलाचा अद्याप तपास सुरूच



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा