Advertisement

नाल्यात पडलेल्या २ वर्षीय मुलाचा अद्याप तपास सुरूच

दिव्यांशचा पोलिस, महापालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान बुधवारी रात्रीपासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्रीपर्यंत त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. त्यामुळं गटारापासून जवळच असलेल्या नाल्यांमध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

नाल्यात पडलेल्या २ वर्षीय मुलाचा अद्याप तपास सुरूच
SHARES

मुंबईतल्या मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये २ वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा पडला. बुधवारी रात्री १०.२४ वाजता ही घटना घडली होती. दिव्यांशचा पोलिस, महापालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान बुधवारी रात्रीपासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्रीपर्यंत त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. त्यामुळं गटारापासून जवळच असलेल्या नाल्यांमध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

१० किमीपर्यंत पाहणी

बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेज लाइनची १० किलोमीटरपर्यंत पाहणी केली. जेसीबीच्या सहाय्यानं ड्रेनेज लाइन फोडून मुलाचा शोध घेतला. मात्र, तरीही गटारात पडलेल्या दिव्यांशचा पत्ता लागला नाही. त्यानंतर, गुरुवारी संध्याकाळी या परिसरात एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. तसंच, ड्रेनेज लाइनमध्ये कॅमेरे सोडून मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी रहिवाशांनी अग्निशमन दलाकडं केली आहे.

रास्ता रोको

गुरुवारी सकाळी पालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी येथील स्थानिकांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोको आंदोलनामुळं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता रोको करणाऱ्यांना ताब्यात घेत वाहतूक पूर्वपदावर आली. 

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

दिव्यांश हा आई-वडील आणि दोन भावंडांसह राहत होता. बुधवारी रात्री त्याचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता त्यांच्या मागे दिव्यांशही गेला. वडील रस्त्यावर कुठे दिसले नाहीत म्हणून तो मागे फिरत असतानाच उघड्या गटारात पडला. काही वेळातच दिव्यांशची आई त्याला शोधण्यासाठी घराबाहेर आली. मात्र, दिव्यांश दिसत नसल्यामुळं तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून येथील लोक जमा झाले. त्यानंही दिव्यांश कुठे न दिसल्यानं जवळच असलेल्या मशिदीबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. या सीसीटीव्हीमध्ये दिव्यांश गटारात पडल्याचं समजताच पोलिस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं.हेही वाचा -

उघड्या गटारांसाठी मुंबईकरही जबाबदार, महापौरांनी फोडलं खापरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा