Advertisement

मध्य रेल्वेची मेन, हार्बर वाहतूक ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी आली एनडीआरएफ

सलग दोन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेची मेन, हार्बर वाहतूक ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी आली एनडीआरएफ
SHARES

मस्जिद रोड ते भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन लोकल ट्रेन अडकून पडल्याने या ट्रेनमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफला बोलवण्यात आलं आहे. त्यातील एक ट्रेन सीएसएमटीवरून निघाली होती, तर दुसरी कर्जतवरून सीएसएमटीकडे जाणारी होती. एनडीआरएफच्या जवानांनी काही प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेरही काढलं आहे. जोपर्यंत ट्रॅकवरून पाणी पूर्णपणे हटत नाही, तोपर्यंत रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सलग दोन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. (central railway main and harbour local train service suspended due to heavy rain in mumbai)

मध्य रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. जोरदार पाऊस आणि पाणी तुंबल्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी मार्गावरील वाहतूक पुढीच सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वेच्या ठराविक फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे बहुतांश प्रवासी घरातच असल्याने लोकल रखडल्याचा मोठा परिणाम दिसून येत नसला, तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मात्र रखडमपट्टी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - पश्चिम रेल्वेचं १९५९ कोटींचं नुकसान

मुंबई व उपनगरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जून आणि जुलैमध्ये फारसा पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्टच्या सुरूवातीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.  

गेल्या २४ तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडला. डहाणू आणि महाबळेश्वर अनुक्रमे ३८३ मिमी आणि ३२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटनुसार, गेल्या २४ तासात सांताक्रूझ येथे ८४ मिमी आणि कुलाबा येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने आणि  दक्षिण गुजरातमध्ये चक्रीय चक्रवात तयार झाल्याने मुसळधार पाऊस झाल्याचं स्कायमेटच्या तज्ञांनी म्हटलं आहे. कोकण आणि गोवा आणि लगतच्या पश्चिम किनारपट्टीवर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज रात्रीपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर तीव्रता कमी होईल आणि पाऊस गुजरातच्या दिशेने जाईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे.  

हेही वाचा - लोकल प्रवासासाठी क्यु-आर कोड मिळवण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा