Advertisement

ऑगस्टच्या पहिल्या ५ दिवसांत मुंबईत ६१ टक्के पाऊस

ऑगस्टच्या सुरूवातीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे.

ऑगस्टच्या पहिल्या ५ दिवसांत मुंबईत ६१ टक्के पाऊस
SHARES

मुंबई व उपनगरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जून आणि जुलैमध्ये फारसा पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्टच्या सुरूवातीपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के पाऊस पडला आहे. महिन्याला सरासरी ५८५.२ मिमी पावसाची नोंद होते. मात्र, ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३५७ मिमी पाऊस पडल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.  


गेल्या २४ तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडला. डहाणू आणि महाबळेश्वर अनुक्रमे ३८३ मिमी आणि ३२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटनुसार, गेल्या २४ तासात सांताक्रूझ येथे ८४ मिमी आणि कुलाबा येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली.  उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने आणि  दक्षिण गुजरातमध्ये चक्रीय चक्रवात तयार झाल्याने मुसळधार पाऊस झाल्याचं स्कायमेटच्या तज्ञांनी म्हटलं आहे. कोकण आणि गोवा आणि लगतच्या पश्चिम किनारपट्टीवर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज रात्रीपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर तीव्रता कमी होईल आणि पाऊस गुजरातच्या दिशेने जाईल, असं स्कायमेटने सांगितलं आहे.  


स्कायमेटच्या पूर्वानुमानानुसार, कोकण आणि गोवा आणि कर्नाटक किनारपट्टी ओलांडून गुजरात ते केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर पुढील २  दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. उद्या मुंबईत पावसाचा जोर कमी राहील. मात्र, ११ ऑगस्टच्या सुमारास मुंबई आणि उपनगरामध्ये पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement