Advertisement

Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद

मागील १० वर्षातील ऑगस्ट महिन्यात नोंद झालेला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे.

Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद
SHARES

सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक केलाय. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईतल्या (Mumbai Rains) काही भागांमध्ये जवळपास ३०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मागील १० वर्षातील ऑगस्ट (August)  महिन्यात नोंद झालेला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे.

हवामान विभागानं (Mumbai Weather) दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. दादर, वरळी, मलबार हिलसारख्या भागांमध्ये जवळपास ३०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसामुळे तीन दुर्घटना झाल्या. याशिवाय तीन जणांचा मृत्यू झाला. वाकोल्यात घर नाल्यात पडून दोन जणांचा तर ठाण्यामध्ये विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय सकाळी वेर्स्टन एक्स्प्रेस वे वर दरड देखील कोसळली. पण यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

तर पावसाचा रेल्वे आणि बेस्टच्या सेवेवर देखील परिणाम झाला. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईत अनेक रस्ते बंद होते. त्यामुळे बेस्टचे जवळपास ६० बसेसचे मार्ग बदलण्यात आले होते. याचा ट्राफिकवर देखील परिणाम झाला. तर रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

पालिका आणि राज्य सरकारनं संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत मंगळवारी सुट्टी जाहीर केली. याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आलं होतं. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं हिंदमाता फ्लायओव्हर, अंधेरी, मालाड आणि मिलन सबवे, किंग सर्कल, दादर टीटी अशा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

दरम्यान बुधवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये अतिवष्टी होऊ शकते. त्यामुळे लोकांनी आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.  



हेही वाचा

येत्या ७२ तासात होणार अतिवृष्टी, पुणे वेधशाळेनं दिला इशारा

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा