Advertisement

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू

दुर्घटनेत १ महिला आणि ३ मुली नाल्यात पडल्या आहे. एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. तर एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. अजून २ जणी बेपत्ता आहेत.

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू
SHARES

गेल्या २४ तासांपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे लँडस्लाईड झाल्यानंतर आता आणखी एक दुर्घटना घडली आहे. सांताक्रूझ भागात नाल्याला लागून असलेली २ घरं कोसळली आहेत. या दुर्घटनेत १ महिला आणि ३ मुली नाल्यात पडल्या आहे.

नाल्यात पडलेल्या तीघांपैकी एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. तर एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. आणखी दोन जणींचा शोध सुरू आहे. 

पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तर नदी नाल्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांताक्रुझमधील वाकोल्या परिसरात मंगळवारी दुपारी नाल्याला लागून असलेली दोन घरं अचानक नाल्यात कोसळली. जोरदार झालेल्या पावसामुळे या घराच्या खालचा भाग हा ढासाळला होता आणि त्यानंतर हे घर पडलं.

घरात राहणारी एक महिला आणि ३ मुली नाल्यात पडल्या. यात एका दोन वर्षांच्या मुलीला स्थानिकांनी वाचवलं. मात्र १६ वर्षाची मुलगी, १ वर्षांची मुलगी आणि एक महिला अशा तिघांचा शोध सुरू आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून शोधकार्य सुरू आहे. तर जखमी मुलीला विन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान ठाण्यातही घोडबंदर रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा विजेच्या खांबाचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ठाण्यातील घोडबंदरवरील ओवळा हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली आहे. तर सकाळी वेर्स्टन एक्स्प्रेस वे वर दरड कोसळली.



हेही वाचा

ठाण्यात पावसाचा पहिला बळी, विजेचा धक्का लागून मत्यू

कांदिवली लँडस्लाईडचा थरारक व्हिडिओ व्हायरल, दृश्य पाहून अंगावर येईल काटा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा