Advertisement

कांदिवली लँडस्लाईडचा थरारक व्हिडिओ व्हायरल, दृश्य पाहून अंगावर येईल काटा

दरड कोसळल्याची थरारक दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत. ही दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

SHARES

कांदिवली-मालाड वेर्स्टन एक्स्प्रेस वे जवळ भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरड कोसळल्याची थरारक दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत. ही दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.  

रस्त्यावर माती आणि दगडांचा ढिग साचला आहे. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बोरीवलीकडून गोरेगावच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतूकीत अडथळा येत आहे. याचाच परिणाम की गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं पुढे सरकत आहे.


या घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. परंतु, ही घटना घडली त्यावेळी तिकडे काही गाड्या उभ्या होत्या. सुदैवानं या गाड्यांवर दरड कोसळली नाही. पण दरड कोसळताच गाडीत बसलेल्यांनी जीव मुठीत धरून पळ काढला.

दरम्यान, मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. येत्या २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तविला आहे.

मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग, मोतीलाल नगर इथं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुंबई महापालिकेनं हाय अलर्ट जाहीर केला. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFच्या तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

६ अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्याचे आदेशही पालिकेनं दिले आहेत. NDRF च्या ३ तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत.



हेही वाचा

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम

Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई, ‘हे’ रस्ते बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा