Advertisement

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम

तुम्ही बोरिवलीहून गोरेगावच्या दिशेनं जात असाल तर हायवे वर लँडस्लाईड झालंआहे हे लक्षात ठेवा... नाहीतर तुम्हाला भयंकर ट्राफिकचा सामना करावा लागू शकतो.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम
SHARES

मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे मालाड-कांदिवली दरम्यान लँडस्लाईड झालं आहे. त्यामुळे गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं पुढे जात आहे.


मालाड-कांदिवली दरम्यान डायवेला लागून असणारा डोंगराचा थोडासा भाग कोसळला आहे. त्यामुळे रस्त्यावर माती आणि दगडांचा ढिग साचला आहे. त्यामुळे बोरीवलीकडून गोरेगावच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतूकित अडथळा येत आहे. 

याचाच परिणाम की गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक धीम्या गतीनं पुढे सरकत आहे. यामध्ये कुणाची जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप तरी समोर आलं नाही. 


दरम्यान, सोमवारी रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं ४ आणि ५ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील भरलं आहे.

सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवार सकाळपर्यंत तरी पाऊसानं  चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. सायन, भांडुप, मुलुंड, लोअर परेल या भागांमध्ये पाणी भरलं आहे.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुंबई महापालिकेनं हाय अलर्ट जाहीर केला. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFच्या तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर

Mumbai Water Lake मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पावसाचा लपंडाव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा