Advertisement

Mumbai water lake मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पावसाचा लपंडाव

मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाची चिंता आहे.

Mumbai water lake मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पावसाचा लपंडाव
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसानं चांगलीच विश्रांती घेतली आहे. यामुळं मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत असून, आता मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाची चिंता आहे. कारण, पावसाच्या विश्रांतीमुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पावसानं हजेरी लावलीच नाही. त्यामुळं गतवर्षांच्या तुलनेत तलावांतील जलसाठा तब्बल साडेतीन लाख दशलक्ष लिटरनं खालावला आहे. पुढील २ महिने पावसाची स्थिती अशीच राहिल्यास जलसाठा रोडावण्याची शक्यता आहे. परिणामी, भविष्यात मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार गुरुवार २३ जुलै रोजी तलावांमध्ये ४ लाख १९ हजार ३१८ दशलक्ष लिटर पाणी जमा झालं आहे. गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये ७ लाख ८५ हजार ०८८ दशलक्ष लिटर, तर २०१८ मध्ये तब्बल ११ लाख ८० हजार ३४१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठी होता. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईकरांना दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला पावसावरच अवलंबून राहावे लागते. यंदा सातही तलाव परिसरात पावसानं पुरेशी हजेरी लावली नाही. दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी तलावांतील जलसाठ्याचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर पाणीपुरवठ्याचं गणित आखण्यात येतं. तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करणं पालिकेला शक्य होतं. मात्र आजघडीला गतवर्षीच्या तुलनेत तलावात मोठी पाणी तूट असल्याने पालिकेचा जल विभाग सतर्क झाला आहे.



हेही वाचा -

Online School: बालवाडी ते १२ वी ‘असा’ होईल अभ्यास, आॅनलाईन वर्गांचं वेळापत्रक जाहीर

Lower Parel Bridge लोअर परळ पुलाचं काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा