Advertisement

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हे' तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता


मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हे' तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता
SHARES

मागील दिवस पडत असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी आणि विहार हे तलाव पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही तलाव ओसंडून वाहण्यासाठी तलावांची १ ते २ मीटर पातळी वाढण्याची गरज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इतर तलावांच्या तुलनेत तुळशी आणि विहार हे तलाव खूप लहान असून त्यांची पाणीसाठवण क्षमतादेखील कमी आहे. 

तुळशीची पाणीसाठवण क्षमता १३९.१७ मीटर ( ८ हजार ८६ दशलक्ष लिटर) आहे. रविवारी या तलावाची पातळी १३९.०७ मीटर होती. या तलावात रविवारी ७ हजार ९०३ दशलक्ष लिटर म्हणजेच ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

विहार तलावाची पाणीसाठवण क्षमता ८०.१२ मीटर म्हणजेच १७ हजार दशलक्ष लिटर आहे. रविवारी या तलावाची पातळी ७७.९६ मीटर होती. आहे. तलाव भरण्यासाठी सुमारे सव्वादोन मीटरपर्यंत पाणीपातळी वाढणे आवश्यक आहे. या तलावात रविवारी १६ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच ९७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.

या २ तलावांव्यतिरिक्त अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. हे तलाव पूर्ण भरल्यानंतर मुंबईला पालिकेला विनाकपात पाणीपुरवठा करणे शक्य होते. हे तलाव भरून वाहण्यासाठी चांगल्या प्रमाणातील पावसाची आवश्यकता आहे. 

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ३१ ऑक्टोबरला सर्व तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येतो. एक ऑक्टोबरला सर्व तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्यकता असते.



हेही वाचा -

Containment Zones List Thane : ठाणेमध्ये 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

मुंबईत ६९१ इमारती सील, 'ही' आहे यादी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा