Advertisement

'बेस्ट'नंतर 'एसटी' ट्विटरवर, अवघ्या २४ तासांत २७४८ फॉलोअर्स


'बेस्ट'नंतर 'एसटी' ट्विटरवर, अवघ्या २४ तासांत २७४८ फॉलोअर्स
SHARES

मुंबईची दूसरी लाइफलाइन 'बेस्ट'नंतर आता एसटी महामंडळानं आपल्या प्रत्येक कामाची माहिती नगरिकांना मिळावी यासाठी ट्विटरवरील अधिकृत अकाऊंट सुरू केले आहे. शनिवारी हे अकाउंट एसटी महामंडळानं @msrtcofficial या नावानं सुरु केलं. अवघ्या २४ तासांत या ट्विटर हँडलला २,७४८ फॉलोअर्स मिळाले आहेत.

महामंडळाचे फेक हँडल गेले काही दिवस व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत होते. महामंडळाने हे हँडल फेक असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी २ दिवसांत अकाऊंट सुरू करण्यात येईल, अशी घोषणा ट्विटरवर केली होती.

शनिवारी हे अकाऊंट सुरू झाले. तब्बल ६५ लाख प्रवाशांची वाहतूक करणारी एसटी ट्विटरवर आल्याने नेटकऱ्यांनी अल्पावधीत फॉलो करत त्याचे स्वागत केले आहे.

सध्यस्थितीत मुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रित येत असतानाच महामंडळातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणार होत आहे. महामंडळातील एकूण रुग्णांपैकी निम्मे करोना रुग्ण बरे झाले असून हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहेत. महामंडळातील एकूण ३२० अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती.

यात कामगार अधिकारी, चालक-वाहक, मॅकेनिक, सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक अर्थात १८१ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

सध्या महामंडळाची मालवाहतूक आणि जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेशात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर आहे. तूर्त एसटीची सामान्य वाहतूक बंद असली तरी सरकारच्या आदेशानंतर पुन्हा एकदा रस्तोरस्ती एसटीची सुरक्षित प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचं समजतं.



हेही वाचा -

महापालिकेच्या संलग्न रुग्णालयांत अन्य रुग्णांवरच उपचार

Coronavirus Pandemic : राज्यात ९५१८ नवे रुग्ण, २५८ जणांचा दिवसभरात मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा