रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, ७ जणांना अटक

५४०० रुपये किंमतीला मिळणारे इंजेक्शन ही टोळी बाजारात ३० हजार रुपयांना विकत होती.

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, ७ जणांना अटक
SHARES

कोरोनावर प्रभावी मानलं जाणारं रेमडेसीवीर इंजेक्शन (Remedesivir injection)चा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ५४०० रुपये किंमतीला मिळणारे इंजेक्शन ही टोळी बाजारात ३० हजार रुपयांना विकत होती. सुधीर बाबू पुजारी,  गुरूविंदर सिंग राठोड, आशिष कनोजिया, रितेश ठोंबरे, भावेश शहा, विकास दुबे, राहुल गाला, अशी या आरोपींची नावे असूनन पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. न्यायालयाने या सर्वांना २४ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः- कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

मुंबईत कोरोना(Coronavirus pandemic)चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. असे असताना बाजारात नागरिकांची दिशाबूल करत त्यांची लूट केली जात आहे. कोरोनावर सध्या कोणतेही औषध नाही. अशा परिस्थित सध्या रेमडेसिवीर हे औषध प्रभावी माणले जात आहे. त्यामुळे या इंजेक्शनला बाजारात मोठी मागणी आहे. या इंजेक्शनची बाजारात किंमत ही ५४०० रुपये इतकी आहे. मात्र काही भूरट्या चोरांकडून या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश तावरे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) आणि अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त रित्या कारवाईकरत या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या आरोपींकडून पोलिसांनी १३ रेमडेसीवर इंजेक्शन जप्त केलेले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.

हेही वाचाः- Kalyan Dombivali Hotspot list :  कल्याण-डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

राज्य सरकारच्या निर्णयानंतर ही...

राज्यात करोनावरील रेमडेसीवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला आहे. याची दखल राज्य सरकारनंही घेतली होती. काळाबाजार रोखण्यासाठी रेमडेसीवीर औषध घेण्याकरिता आधारकार्ड सक्तीचं करण्यात आलं होतं. रेमडेसीवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले होते. ज्या रुग्णांना रेमडेसीवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे, त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे औषध घेण्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहितीही कॅबिनेट मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा