Advertisement

कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण


कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
SHARES

महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईचे पालकमंत्रीदेखील असणारे अस्लम शेख यांनी ट्विट करत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.

अस्लम शेख यांनी यावेळी आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणं जाणवत नसून विलगीकरण केलं असल्याची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे.

'मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझ्यामध्ये सध्या कोरोनाची कोणती लक्षणं नसून, स्वत:चं विलगीकरण केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी करोनाची चाचणी करण्याची विनंती करतो. मी घरातून काम करत राज्यातील लोकांची सेवा करण्याचं काम सुरु ठेवणार आहे', अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी ट्विटरद्वारे दिली.



हेही वाचा -

महापालिकेच्या संलग्न रुग्णालयांत अन्य रुग्णांवरच उपचार

Coronavirus Pandemic : राज्यात ९५१८ नवे रुग्ण, २५८ जणांचा दिवसभरात मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा