Advertisement

मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान बॅटींग


मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान बॅटींग
SHARES

मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारीदेखील पावसाचा जोर कायम राहिला असून, सकाळी ८ वाजताच्या नोंदीनुसार मुंबईत सरासरी १९१.२ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस सुरु असतानाच एकूण २८ ठिकाणी झाडे कोसळली. १२ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या, ५ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.

महालक्ष्मी, कुलाबा, वांद्रेसह लगतच्या उपनगरातदेखील पावसाने मुसळधार हजेरी लावली असून, या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड झाली आहे. सुदैवाने यात काही हानी झालेली नाही. गुरुवारी सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे हिंदमाता, वडाळा येथील सक्कर पंचायत चौक, सायन येथील एसआयईएस कॉलेज, धारावी रेस्टॉरंट, शेख मिस्त्री दर्गा रोड, पोस्टल कॉलनी, चेंबूर येथील टेबी ब्रीज, देवनार येथील बैंगनवाडी, अंधेरी सबवे, पोयसर सबवे, खार सबवे, मालाड सबवे आणि मिलन सबवे येथील सखल भागात पाणी साचले होते.

महापालिकेने येथील पाण्याचा निचरा केल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुंबई शहरात १३०.४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच, पूर्व उपनगरात ९४.५५ मिमी आणि पश्चिम उपनगरात ११२.१५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईच्या अनेक भागातील पावसाची नोंद

  • नरिमन पॉइंट १२९.४
  • फोर्ट १४३.९७
  • मांडवी फायर स्टेशन ११९.७८
  • मेमनवाडा १३०.७८
  • ग्रँट रोड १४१.७
  • मलबार हिल १५६.९५
  • मुंबई सेंट्रल १३८.१६
  • वडाळा १४७.३१
  • दादर १६२.३२
  • धारावी १५३.३९
  • वरळी १६४.३३
  • हाजीअली १४४.७४
  • वांद्रे १७९.५८
  • मरोळ ४२.१८
  • विलेपार्ले १६७.१
  • अंधेरी १७९.७६
  • वर्सोवा १६३.५३
  • मालवणी ८३.३
  • चिंचोळी ९३.४६
  • मालाड ९९.०६
  • गोरेगाव ९५.७४
  • बोरीवली ९१.१४
  • दहिसर ७२.३३
  • कांदिवली ९७.४८
  • कुर्ला ११०.९४
  • चेंबुर १४४.९९
  • विक्रोळी १०८.१७



हेही वाचा -

मुसळधार पावसाने मुंबईचे केले ‘इतके’ नुकसान

बारावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा