Advertisement

बारावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के

कोकण विभागानं निकालात बाजी मारली आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे.

बारावीच्या निकालात मुलींची बाजी, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के
SHARES

लाखो विद्यार्थ्यांचे डोळे लागलेला बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे.

कोकण विभागानं निकालात बाजी मारली आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. यंदाच्या वर्षी बारावीच्या  परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे. 

मुलींचा निकाल ९३.८८ टक्के लागला तर मुलांचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ८२.६३ टक्के, वाणिज्य शाखा निकाल ९१.२७ टक्के, तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.९३ टक्के तसेच MCVC चा निकाल ९५.०७ टक्के लागला आहे. दरम्यान, सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के लागला आहे.

विभागनिहाय निकाल

कोकण - ९५.८९
पुणे - ९२.५०
कोल्हापूर -९२.४२
अमरावती - ९२.०९
नागपूर -९१.६५
लातूर - ८९.७९
मुंबई - ८९.३५
नाशिक - ८८.८७
औरंगाबाद - ८८.१८


पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com


ऑनलाइन गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढीलप्रमाणे

 http://verification.mh-hsc.ac.in

महत्त्वाच्या तारखा

गुणपडताळणीसाठी अर्ज - १७ जुलै २०२० ते २७ जुलै २०२०

छायाप्रतीसाठी अर्ज - १७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा