मुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईत बुधवारी शहरात कुलाबा येथे ३९.० मीमी पाऊस तर सांताक्रूझमध्ये ८०.२ मीमी पावसाची नोंद ही सायंकाळी ५.३० पर्यंत करण्यात आली आहे. तर दिवसभरात मुंबईत ठिक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तर २४ ठिकाणी झाडे पडल्याची व ६ ठिकाणी शाँर्ट सर्किट झाल्याच्या आणि ४ ठिकाणी दुर्घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचाः- पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’
मुंबईवर आधीच कोरोनाचे सावट असताना वेळोवेळी पाऊस हा परीक्षा घेत आहे. मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुरूवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर टीटी, सायन रोड नं २४ , रुईया काँलेज, शेखर मेस्त्री रोड माटुंगा, बीपीटी काँलनी, टिळक ब्रीज दादर, अंधेरी सब वे, खार लिंक रोड, खास सब वे या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे काही काळासाठी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद करून वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्या आली होती. त्यानंतर पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचाः- नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही - महापालिका
तर सोमवारी पडलेल्या पावसात १३ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात शहरात ४, पूर्व उपनगरात ७, पश्चिम उपनगरात १३ झाडं पडल्याची अशी एकून २४ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच पावळ्यात शहरात अनेक ठिकाणा शाँर्ट सर्किटच्या ही घटना घडत असतात, बुधवारी मुंबईत ६ ठिकाणी शाँर्ट सक्रिटच्या घटना घडल्या असून त्यात शहरात १, पूर्व उपनगरात २ तर पश्चिम उपनगरात ३ घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर मुंबईत बुधवारच्या मुसळधार पावसात ४ ठिकाणी घरे किंवा त्याच्या भिंती पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. मुंबईच्या पाववाला लेन ग्रॅण्टरोड परिसरात ३ मजली इमारतीच्या पहिल्यामाळ्यावरील घराचा काही भाग कोसळला. या इमारतीत २० कुटुंब रहात होती. त्यांचे सध्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. या दुर्घटनेच दोन जण किरकोळ जखमी झाली होती. त्यांना पोलिसांनी तातडीने जवळील रुग्णालयात नेले. माञ सुदैवाने या सर्व नैसर्गिक दुर्घटनेत कोणती ही जिवीत हानी झालेली नाही.