मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस पडल्यास नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्याशिवाय, सखल भागांत पाणी साचल्यास मॅनहोलमध्ये पडून वाहून जाण्याची भीती स्थानिकांना असते. त्यामुळं महापालिकेकडून पावसाळ्यात सखल भागात पाणी साचल्यास रस्त्यावरून चालताना सतर्क राहण्याचा इशारा देते. मात्र, स्थानिकांच्या नाल्यात वाहून जाण्याच्या तक्रीरी वाढल्या आहेत. असं असताना महापालिकेनं चक्क 'नाल्यात पडून दुर्घटना झाल्यास पालिका जबाबदार नाही!', असा फलक महापालिकेनं नाल्याजवळ लावला आहे. गोरेगाव पूर्वेकडील आंबेडकर नगरातील नाल्याजवळ महापालिकेनं हा फल लावला आहे.
महापालिकेनं लावलेल्या या फलकामुळं या परिसरातील स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, नाराजी व्यक्त केली जात आहे. तसंच, या फलकामुळं वाद उद्भवला आहे. 'पावसामुळे नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन दुर्घटना होतात. म्हणून पालिके ने अंध, अपंग व लहान मुलांची काळजी घ्यावी', असाही इशारा देणारा फलक या ठिकाणी लावला आहे.
गतवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी कुटुंबीयांची नजर चुकवून नाल्याजवळ गेलेला एक दीड वर्षांचा मुलगा नाल्यात पडून वाहून गेला होता. त्यामुळं स्थानिक रहिवाशांमध्ये या फलकावरून नाराजी आहे. या परिसरातील भारतभाई चाळीत गेल्या वर्षी १० जुलै रोजी दीड वर्षांचा एक मुलगा उघड्या नाल्यात पडून वाहून गेला. या प्रकरणामुळं महापालिकेला खूप टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं या वर्षी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं या चाळीच्या दोन्ही टोकांना असे बोर्ड लावले आहेत.
गतवर्षी प्रमाणं यंदा अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा पालिका जबाबदार राहणार नाही, असे म्हणून पालिकेनं आपली जबाबदारी झटकल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. या दुर्घटनेची आठवण करून देणाऱ्या या फलकामुळे दिव्यांशचे कुटुंबीयदेखील व्यथित झाले आहे.
हेही वाचा -
KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात