Advertisement

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात

KEM च्या स्टाफसाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. यामुळे कोरोना रुग्णांचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणं सोप्प जात आहे.

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात
SHARES

मुंबईच्या KEM रुग्णालयानं अधिकृतपणे COVID 19 रुग्णांची माहिती (record) डिजिटल स्वरूपात करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी KEM च्या स्टाफसाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. यामुळे कोरोना रुग्णांचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणं सोप्प जात आहे. हा अ‍ॅप मे महिन्यातच बनवण्यात आला होता. पण मंगळवारपासून त्याचा श्री गणेशा करण्यात आला आहे.

डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासनांना यापुढे COVID 19 रुग्णांच्या शारीरिक वैद्यकीय नोंदणीचे कागदपत्र हाताळण्याची गरज भासणार नाही. यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कागदपत्रं हाताळल्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची भिती अधिक असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कागदपत्रांची देवाण-घेवाण न करता रुग्णाला तपासता येईल. कारण त्याची रुग्णाची सर्व माहिती डिजिटली नोंद केलेली असेल.

के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या प्रोग्रामरद्वारे अॅपची रचना ही विनामूल्य विकसित केली गेली आहे. एखाद्या रूग्णाची तपासणी होताच त्याचा / तिचा अनोखा ओळख क्रमांक अ‍ॅपवर अपलोड केला जातो. ज्यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या बटणाच्या क्लिकवर रेकॉर्ड उपलब्ध होतात.


हेही वाचा : व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचा आरोप चुकीचा, महानगरपालिका प्रशासनाचा खुलासा


अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाबरोबरच इतर कोणत्याही संबंधित माहितीच्या तपशीलांव्यतिरिक्त, अॅपद्वारे रुग्णाला रीअल-टाइममध्ये दिली जाणारी औषधे देखील दर्शविली जाऊ शकतात. अ‍ॅपमध्ये रुग्णाच्या आरोग्याविषयी आणि त्वरित धोक्‍यांची माहिती देखील दिली जाते. याच्या मदतीनं डॉक्टरांना कुटुंबास माहिती देणं सोप्प जाईल.

असं म्हटलं जातं की, KEM रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाला या अ‍ॅपचा प्रवेश दिला आहे. जेणेकरुन ते रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती देऊ शकतील. अमित भोंडवे, योगेश पावडे, अभिजीत धेंडे, परवेज चाकी आणि निखिल राव यांच्या पाच डॉक्टरांच्या पथकाची रुग्णांच्या माहितीवर नजर आहे.

विशेष म्हणजे के. सोमय्या इथं प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पावडे यांची पत्नी प्रा. दिप्ती पावडे तिच्या सहकाऱ्यांसह या नवीन अॅपच्या विकासामध्ये सहभागी होती. ती संस्थेत माहिती तंत्रज्ञान शाखेत कार्यरत आहे.



हेही वाचा

Coronavirus Pandemic : मुंबईत कोरोनाचे १३९० रुग्ण, दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू

मास्क,सॅनिटायजरच्या दर निश्चितीसाठी समिती गठीत – राजेश टोपे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा