Advertisement

Coronavirus pandemic : मुंबईत कोरोनाचे १३९० रुग्ण, दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू

बुधवारी दिवसभरात १ हजार १९७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६७ हजार ८३० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic : मुंबईत कोरोनाचे १३९० रुग्ण, दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे २३३ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत बुधवारी दिवसभरात १३९० नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-नवी मुंबईत बुधवारी ३५६ नव्या रुग्णांची नोंद

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जुलै रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १२ जुलै रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १३९० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९६ हजार २५३ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात १ हजार १९७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६७ हजार ८३० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Maratha Reservation: मराठा आरक्षण स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार- अशोक चव्हाण

राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२  हजार ६१३  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ७९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ११ हजार ८०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २३३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९६ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २३३ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-५, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-१५, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी-निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१,वसई-विरार मनपा-५, रायगड-४, पनवेल मनपा-१, नाशिक-४, नाशिक मनपा-९, धुळे-१, धुळे मनपा-२, जळगाव-५, जळगाव मनपा-९, पुणे-६, पुणे मनपा-३१, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-१, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-४, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा