Advertisement

नवी मुंबईत बुधवारी ३५६ नव्या रुग्णांची नोंद

नवी मुंबईत गेल्या ६ दिवसांमध्ये १७५५ रुग्ण सापडले आहेत.

नवी मुंबईत बुधवारी ३५६ नव्या रुग्णांची नोंद
SHARES

नवी मुंबईत बुधवारी ३५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता १० हजार २७३ वर गेला आहे. तर मृतांची संख्या ३१८ झाली आहे.

नवी मुंबईत गेल्या ६ दिवसांमध्ये १७५५ रुग्ण सापडले आहेत. बुधवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ५५, नेरुळ ९३, वाशी २९, तुर्भे ३३, कोपरखैरणे ४७, घणसोली ४८ , ऐरोली ३९ आणि दिघातील १२ रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी २७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३०, नेरुळ ३१, वाशी ५०, तुर्भे १५, कोपरखैरणे ५७, घणसोली ५५, ऐरोली ३३, दिघामधील ७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६३५० वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ३६०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा -

धारावी कोरोनामुक्तीकडे, अवघे 'इतके' आहेत अ‍ॅक्टिव रुग्ण

शंभरीतील आजोबांची कोरोनावर मात, रुग्णालयातच केला १०१ वा वाढदिवस साजरा


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा