
नागपूर–मुंबई समृद्धी महामार्गावर 2025 मध्ये अपघात आणि मृत्यूंच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची माहिती महाराष्ट्र महामार्ग पोलिसांच्या प्राथमिक आकडेवारीतून समोर आली आहे. तर दुसरीकडे मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर एकूण अपघातांमध्ये थोडी घट झाली. तरी किरकोळ अपघातांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
सहा लेनचा समृद्धी महामार्ग डिसेंबर 2022 पासून टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. गेल्या वर्षी या महामार्गाचा संपूर्ण मार्ग सुरू झाला. या मार्गावरील देखरेख वाढवण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी सध्या इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) लागू करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील मृत्यूंच्या घटनांमध्ये 22 टक्क्यांनी घट झाली आहे. 2025 मध्ये या एक्स्प्रेसवेवर 187 अपघात नोंदवले गेले. तर 2024 मध्ये ही संख्या 191 होती. त्यामुळे अपघातांच्या एकूण संख्येत सुमारे 2 टक्क्यांची घट झाली आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडेवारी
एकूण अपघात:
2025: 185
2024: 137
प्राणघातक अपघात:
2025: 128
2024: 96
गंभीर जखमी:
2025: 140
2024: 50
या आकडेवारीवरून समृद्धी महामार्गावर अपघात, प्राणघातक घटना आणि गंभीर जखमींच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या महामार्गावरील वेग नियंत्रण, सुरक्षा उपाय आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
