Advertisement

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर

हवामान खात्यानं (MD) ४ आणि ५ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर
SHARES

सोमवारी रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला (Mumbai Rains) सुरुवात झाली आहे. हवामान खात्यानं (MD) ४ आणि ५ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील भरलं आहे.

सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. सोमवार संध्याकाळपासून ते मंगळवार सकाळपर्यंत तरी पाऊसानं  चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. दादर टीटी, हिंदमाता, सायन, भांडुप, मुलुंड, लोअर परेल या भागांमध्ये पाणी भरलं आहे. 

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुंबई महापालिकेनं हाय अलर्ट जाहीर केला. सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFच्या तुकड्याही अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत.

६ अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्याचे आदेशही पालिकेनं दिले आहेत. NDRF च्या ३ तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच कोस्ट गार्ड, नेव्ही यांना तत्पर राहण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या आहेत.

मिठी नदीची पातळी वाढली तर स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २४ वॉर्डमध्ये तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून गरज पडल्यास शाळा उघडून ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी ६ पंपिंग स्टेशन्स आणि २९९ पंप कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिकेनं दिले आहेत.

बंगालच्या उपसागरात उत्तरेस कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचसोबत अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती.

हवामान विभागानं मुंबई आणि परिसरास सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसा

नंच हजेरी लावली. सोमवारी सायंकाळी उशिरा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी आल्या. या भागात सुमारे २० ते ४० मिमी पाऊस झाला. तर भायखळा आणि परिसरात ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. पश्चिम उपनगरे, मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरात १० ते २० मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरीत ठिकाणी हलका (५ ते १० मिमी) पाऊस नोंदविण्यात आला.



हेही वाचा

मुंबईत २० टक्के पाणीकपात

Mumbai Water Lake मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव परिसरात पावसाचा लपंडाव

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा