Advertisement

मुंबईत शनिवारपासून २० टक्के पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईत शनिवार १ ऑगस्ट पासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

मुंबईत शनिवारपासून २० टक्के पाणीकपात
SHARES
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईत शनिवार १ ऑगस्ट पासून २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी आगामी काळात पाण्याची तूट भासू नये म्हणून पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.


यंदा आतापर्यंत मागील दोन वर्षाच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ४ लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या हा साठा ३४ टक्के आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर पाणी होते. ही तूट लक्षात घेऊन पालिकेनं शनिवारपासून २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईची तहान भागवण्यासाठी आणखी मुसळधार पावसाची आवशकता आहे. गेल्या काही दिवसांआधी झालेल्या पावसामुळे काही धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी आहे.  त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे.



हेही वाचा

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स या तारखेपासून उघडणार

Electricity Bill: सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत? सरकार ‘अशा’ पद्धतीने करतंय विचार




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा