Advertisement

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स या तारखेपासून उघडणार

महाराष्ट्र सरकारनं बुधवारी 'मिशन बिग इंडिया' अंतर्गत शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स या तारखेपासून उघडणार
SHARES

राज्यात आर्थिक हालचाली रुळावर आणण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं बुधवारी 'मिशन बिग इंडिया' अंतर्गत शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि उर्वरित राज्यात मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सिनेमागृहांशिवाय कार्यरत राहतील. तसंच, फुड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ दरम्यान कार्यरत असतील. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना निर्बंधासह ऑपरेट करण्याची परवानगी आहे आणि पालिका अधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.

२९ जुलै रोजी सरकारनं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, "हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनाच होम डिलिव्हरीला परवानगी असेल. तर स्विमिंग पूल चालवण्यास परवानगी नाही. गोल्फ कोर्स, आउटडोअर जिम्नॅस्टिक, टेनिस आणि आउटडोअर बॅडमिंटनसारखे मैदानी खेळ ५ ऑगस्टपासून ग्रुप न करता खेळता येऊ शकतात.

हेही वाचा : मुंबईत रुग्णवाढीचा दर १ टक्क्यापेक्षाही कमी

मुंबई प्रदेशात म्हणजेच MMR मध्ये अनावश्यक कारणासाठी लांब पल्ल्याच्या म्हणजेच इंटरनॅशनल प्रवासाची परवानगी नाही. तर देशाअंतर्गत कोणत्याही आवश्यक किंवा कार्यालयीन कामासाठी प्रवास करता येईल.

यासह घराबाहेर पडताना मुखवटे घालणं अनिवार्य आहे. दुचाकीवरून प्रवास करताना टॅक्सीमध्ये पूर्वीसारखे ४ प्रवासी नाही बसवू शकत. तर केवळ २ प्रवाशांना परवानगी असेल. तर रिक्षात दोन व्यक्ती बसण्यास परवानगी आहे.

कोरोनोव्हायरसचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नात स्थानिक परिस्थितीनुसार, नगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी आवश्यक बंधने घालू शकतात, असं या आदेशात म्हटलं आहे.

सामान्य प्रवाश्यांसाठी मुंबई लोकल सेवा सेवा करण्यास मनाई आहे. तरीही राज्य सरकारनं सामाजिक सेवा आणि स्वच्छताविषयक उपायांसह जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह बस सेवा प्रवासासाठी परवानगी दिली आहे.



हेही वाचा

सेरोलॉजिकल मॉनिटरींगचा पालिका सुरू करणार दुसरा टप्पा

Electricity Bill: सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत? सरकार ‘अशा’ पद्धतीने करतंय विचार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा