Advertisement

मुंबईत रुग्णवाढीचा दर १ टक्क्यापेक्षाही कमी

मुंबईत चाचण्यांची संख्या वाढली असली तरी नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणदेखील कमी झालं आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा दर १ टक्क्यापेक्षाही कमी
SHARES

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यापेक्षाही खाली आला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७२ दिवसांवर गेला आहे. 


मुंबईत कोरोनावर नियंत्रण आलं असल्याचं दिसून येत आहे. सध्या एकूण १७ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ८५ हजार ३२७ पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे. २८ जुलै रोजी ११ हजार ६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. हा मुंबईतील एका दिवसातील चाचण्यांचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.


मुंबईत चाचण्यांची संख्या वाढली असली तरी नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणदेखील कमी झालं आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.  मुंबईतील २४ वाॅर्डपैकी १८ वाॅर्डमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ७२ दिवस झाला आहे. १४ वाॅर्डमध्ये रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी हा ७२ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यातही चार विभागात ९० दिवसांपेक्षा अधिक तर दोन विभाग १०० दिवसांपेक्षा अधिक रुग्ण दुपटीचा कालावधी आहे. 



मुंबईत कोरोनाचे १११८ नवे रुग्ण, दिवसभरात ६० जणांचा मृत्यू




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा