Advertisement

महाराष्ट्रात लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला; नव्या आदेशात पाहा काय सुरु-काय बंद

सध्या कोरोनामुळे मृतपावणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यास शासनाला यश मिळाले आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळेच केंद्रापाठोपाठ राज्यसरकारने ही ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवलेला आहे

महाराष्ट्रात लॉकडाऊन  ‘या’ तारखेपर्यंत वाढवला; नव्या आदेशात पाहा काय सुरु-काय बंद
SHARES

महाराष्ट्रात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वत्र शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनामुळे मृतपावणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यास शासनाला यश मिळाले आहे. मात्र धोका अद्याप टळलेला नाही त्यामुळेच केंद्रापाठोपाठ राज्यसरकारने ही ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवलेला आहे.

हेही वाचाः- Bakra Eid: बकऱ्यांशिवाय कुर्बानी कशी द्यायची? अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

कोरोनावर नियंत्रण मिळवताना राज्याची आर्थिक घडी पून्हा बसवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याबरोबरच ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काही निर्णयांवर निर्बंध शिथील करणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र निर्बध शिथिल करताना नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी राज्यसरकारकडून करण्यात आली आहे. सोबतच आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही. असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही.

हेही वाचाः- राफेल गेमचेंजर ठरेल हा समज चुकीचा- शरद पवार

दरम्यान, दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक २, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक १ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार, राज्यात येत्या ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा