Advertisement

राफेल गेमचेंजर ठरेल हा समज चुकीचा- शरद पवार

राफेल आल्यामुळं चीनची चिंता वाढेल किंवा ही विमाने गेमचेंजर ठरतील, असा जो समज पसरवला जातोय तो चुकीचा असल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

राफेल गेमचेंजर ठरेल हा समज चुकीचा- शरद पवार
SHARES

राफेल लढाऊ विमानं भारतीय सैन्यदलात दाखल होणं ही बाब देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नक्कीच महत्त्वाची आहे. यांत कुठलंही दुमत नाही. मात्र राफेल आल्यामुळं चीनची चिंता वाढेल किंवा ही विमाने गेमचेंजर ठरतील, असा जो समज पसरवला जातोय तो चुकीचा असल्याचं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी हे मत व्यक्त केलं. (ncp chief sharad pawar comment on rafale fighter jet)

यासंदर्भात अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, चीनची लष्करी ताकद आपल्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. त्या बाबतीत त्यांच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही. आपल्याकडं १० लढाऊ विमानं असतील तर त्यांच्याकडं हजार आहेत. एवढा हा मोठा फरक आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेकडे चीन गंभीरपणे पाहत असेल यात शंका नाही. पण राफेल आपल्या सैन्यदलात सामील झाल्यामुळे चीनची चिंता वाढेल, असं मला बिलकुल वाटत नाही. शिवाय राफेल आल्यामुळं आपल्या सर्व चिंता चुटकीसरशी मिटतील असा पसरवण्यात आलेला समजही चुकीचा आहे.

हेही वाचा - Ram Mandir: बोलवलं तरी अयोध्येत भूमिपूजनाला जाणार नाही- शरद पवार

खरं तर राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय खूप जुना आहे. काँग्रेसनं त्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु मोदी सरकारच्या काळात हा रखडलेला करार पूर्णत्वास आला. ही चांगली बाब आहे, त्यासाठी श्रेय घेण्याचा किंवा वादाचा प्रश्नच उद्धवत नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

फ्रान्समधील दसाॅल्ट एव्हिएशन कंपनीकडून भारताने ३६ विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. या करारानुसार पहिल्या टप्प्यात ५ लढाऊ विमानांचं बुधवार २९ जुलै २०२० रोजी भारतातील अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग झालं आहे. इथंच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केलं होतं. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एक दिवस थांबली. त्यानंतर ती भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत ३ सिंगल सीटर आणि २ डबल सीटर विमाने आहेत.

राफेलची तुकडी हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच, पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकात्ता या युद्धनौकेबरोबर संपर्क साधला. तेव्हा नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या. टेहळणी, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला सर्व कामे करण्यासाठी राफेल सक्षम आहे. ८ विमानांची काम एकटं राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटलं जातं. 

हेही वाचा - आता, मुख्यमंत्र्यांनीही थोडं फिरायला हवं, अखेर शरद पवारच बोलले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा