Advertisement

धारावीत बुधवारी अवघे २ रुग्ण सापडले

मुंबईत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेली धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बुधवारी धारावीत फक्त कोरोनाचे २ रुग्ण सापडले आहेत.

धारावीत बुधवारी अवघे २ रुग्ण सापडले
SHARES

मुंबईत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेली धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बुधवारी धारावीत फक्त कोरोनाचे २ रुग्ण सापडले आहेत. येथील रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस घटत आहे. सध्या येथे ८३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत धारावीत कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असताना धारावीला लागून असलेल्या माहीम आणि दादरमध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे. बुधवारी माहिम परिसरात २५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादरमध्येही २५ नवीन रुग्ण सापडले आहेत. 


तीन महिन्यांपूर्वी धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळं धारावीला कोरोनामुक्त करण्यास यश आलं आहे. धारावीच्या या पॅटर्नचं कौतुक केंद्र सरकारनंही केलं आहे. धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा २ हजार ५४५ वर गेला आहेत. यामधील २ हजार २१२ रुग्ण बरे झाले आहेत.

माहिममध्ये १ हजार ६५७ रुग्ण उपचार घेत आहेत. माहिममध्ये आतापर्यंत १ हजार ३५७ रुग्ण बरे झाले आहेत. धारावी, दादर, माहीम हा भाग मुंबई पालिकेच्या जी उत्तर विभागात येतो. जी उत्तरमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या  ५ हजार ८९१ आहे. यामधील ४ हजार ७४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या येथे एकूण ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.हेही वाचा -

दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी
Read this story in हिंदी
संबंधित विषय