Advertisement

दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

दहावीचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींचीच बाजी
SHARES

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९२ टक्के इतका लागला.

बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत ९६.९१ टक्के मुली, तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल ९७.३ ४ टक्के लागला, तर मुंबई विभागातून ९६.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

राज्यातील ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. एकूण १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येईल. 

दहावीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यभरातून १ ७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ७५  हजार ८ ९४ विद्यार्थी तर ७ लाख ८९ हजार ८९४ विद्यार्थीनी होत्या. राज्यातील एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर ४९७९ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान, यावर्षी दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च ते २ ३ मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होता. मात्र कोरोनाची वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला.

राज्याचा निकाल ९५.३० टक्के

कोकण ९८.७७ टक्के

पुणे ९७.३४ टक्के

नागपूर ९३.८४ टक्के

औरंगाबाद  ९२ टक्के

मुंबई ९६.७२ टक्के

कोल्हापूर ९७.६४ टक्के

अमरावती ९५.१४ टक्के

नाशिक  ९३.७३ टक्के

लातूर  ९३.०९ टक्के

इथे पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.



हेही वाचा

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा