Advertisement

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद

सोनू सूद (Sonu Sood) गेल्या एक दोन दिवसात व्हायरल झालेल्या 'वॉरिअर आजीं'ची मदत करणार आहे.

'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद
SHARES

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या एक दोन दिवसात व्हायरल झालेल्या 'वॉरिअर आजीं'ची मदत करणार आहे. त्यानं या संदर्भात ट्वीट देखील केलं आहे. या आजीबाई कोरोनाच्या संकटात पोट भरण्यासाठी रस्त्यावर लाठीकाठीचं प्रात्यक्षिक दाखवत होत्या. या कठीण प्रसंगातही त्यांची जिद्द अनेकांच्या पसंतीस उतरल्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे.

ट्वीटमध्ये सोनू असं म्हणाला आहे की, 'या आजींबरोबर एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे. ज्याठिकाणी त्या देशातील महिलांना स्वत:चं संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देतील'

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या आजी पुण्यातील हडपसर याठिकाणच्या असून त्यांचे नाव शांताबाई पवार आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांची आणि कुटुंबाची झालेली परवड थांबवण्यासाठी त्या स्वत: पैसे कमावण्यासाठी बाहेर पडल्या आहे. लहानपणापासून डोंबारी खेळ करणाऱ्या आजी या वयातही खेळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत मागत असल्याचा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. आजींनी दोन सिनेमामध्येही काम देखील केलं आहे. रितेश देशमुख, सोनू सूद यांसारखे अनेक जण या आजींच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.



हेही वाचा

व्हॅक्सीन बनवण्याची जबाबदारी सोनू सूदला द्या, चाहत्याला सोनूचं मजेशीर उत्तर

‘ते’ वृत्त निराधार, अमिताभ बच्चन यांचं ट्विट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा