Advertisement

व्हॅक्सीन बनवण्याची जबाबदारी सोनू सूदला द्या, चाहत्याला सोनूचं मजेशीर उत्तर

अनेकदा त्याचे चाहते त्यांच्याकडून भलतीच फर्माईश करतात. तो देखील मस्करीमध्ये घेत चाहत्यांना मजेशीर उत्तर देतो.

व्हॅक्सीन बनवण्याची जबाबदारी सोनू सूदला द्या, चाहत्याला सोनूचं मजेशीर उत्तर
SHARES

चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अॅक्टर सोनू सूदनं हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी दिवसरात्र एक केले. सोनू अजूनही अडचणींमध्ये अडकलेल्यांना मदत करत आहे.

सोशल मीडियावर त्याला जो कुणी मदत मागतो, त्याला तो निराश करत नाही. त्याचं काम करण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतो. अनेकदा त्याचे चाहते त्यांच्याकडून भलतीच फर्माईश करतात. तो देखील मस्करीमध्ये घेत चाहत्यांना मजेशीर उत्तर देतो.

नुकतंच त्याच्या चाहत्यानं ट्विटरवर लिहिलं की, आता वेळ आली आहे कोरोनाची व्हॅक्सीन बनवण्याची जबाबदारीही सोनू सूदला द्यायला हवी. सोनूनं या ट्विटवर गमतीशीर उत्तर देताना लिहिलं की, हाहाहा, इतकी मोठी जबाबदारी देऊ नको भाई.

कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागले आणि यानंतर सोनू सूद सर्वांचा आवडता झाला. हजारो प्रवासी घरी पाठवल्यानंतर सोनूनं अजून एक पुढाकार घेतला आहे. आता तो परप्रांतीयांना नोकर्‍या मिळवून देण्यासही मदत करणार आहे. यासाठी सोनूने 'प्रवासी रोजगार' नावाचं एक अॅप सुरू केलं आहे. जे स्थलांतरितांना नोकरी शोधण्यासाठी माहिती आणि योग्य लिंक प्रदान करेल.



हेही वाचा

‘ते’ वृत्त निराधार, अमिताभ बच्चन यांचं ट्विट

'फोन भूत'मध्ये झळकणार कतरिना, इशान आणि सिद्धार्थ

रोमँटिक संगीतमय सिरीज ‘बंदिश बँडिट्स’चा ट्रेलर प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा