Advertisement

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी

वृषभनं साइन केलेल्या या चित्रपटाच्या रकमेतूनच स्वतः साठी काहीही खर्च न करता पोलीस बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे.

अभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी
SHARES

सध्या सर्वच कलाकार कोरोना अभावी गरजूंना मदतीसाठी पुढे सरसावल्याचं चित्र दिसत आहे. कलाकारांनी केलेल्या मदतीबद्दल काही शंकाच नाही. मात्र, तरुण नवकलाकारांचा मदतीसाठी पुढाकार ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.

अभिनेता वृषभ शहा हा नवोदित कलाकार असून आता लवकरच तो 'शारदा प्रॉडक्शन' निर्मित 'मंगलाष्टक रिटर्न' या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. वृषभनं साइन केलेल्या या चित्रपटाच्या रकमेतूनच स्वतः साठी काहीही खर्च न करता पोलीस बांधवांना मदतीचा हात पुढे केला आहे.

वाढदिवसाचं औचित्य साधत त्यानं थर्मोमिटर, सॅनिटायझेशन बॉक्स, एनडी ऑकसोमिटर असं आवश्यक वैद्यकिय सामान पोलिसांना दिलं. अभिनेता वृषभ शहानं केलेली ही कामगिरी नक्कीच उल्लेखनीय आहे. अशा प्रकारची मदत करून वृषभनं सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच घर केलं आहे.

याबद्दल वृषभ म्हणाला, 'सध्या कोरोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या महामारीच्या काळात आपल्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणाऱ्या पोलीस बांधवांचा मी कायम ऋणी आहे. आज ते आपल्या सर्वांसाठीच रिअल हिरोजची भूमिका अगदी काटेकोरपणे बजावत आहेत. म्हणूनच या आपल्या रिअल हिरोजकरिता एक लहानसा खारीचा वाटा म्हणून मी माझ्या 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटाच्या साइन केलेल्या रकमेतून ही मदत करत आहे. '


हेही वाचा

अभिनेत्री रेखा यांचा कोरोना चाचणी करण्यास नकार

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं उचललं 'हे' पाऊल

ऐश्वर्या राय-बच्चन, आराध्या देखील COVID 19 पॉझिटिव्ह

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement