Advertisement

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं उचललं 'हे' पाऊल

सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत रीया चक्रवर्तीनं 'हे' पाऊल उचललं आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत रिया चक्रवर्तीनं उचललं 'हे' पाऊल
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं (sushant singh rajput) अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झालं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात क्रिती सेनन आली. पण या दोघांनी कधीच आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही.

पण मध्यंतरीच्या काळात दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण त्यानंतर सुशांतच्या आयुष्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आली. पण त्यांनी देखील आपल्या नात्याची कबुली कधीच दिली नाही. पण त्यांचे एकत्र असे अनेक फोटो व्हायरल होत होते.  

सुशांतच्या आत्महत्येनंतर रियानं कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. नाही कुठल्या मीडया चॅनलला नाही तिच्या सोशल अकाऊंटवर. फक्त तिनं पोलिसांना चौकशी दरम्यान सुशांतसोबत नात्यात असल्याचं कबुल केलं होतं. पण आता समोर आलं आहे की, रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सुशांत आणि आपला फोटो शेअर केला आहे.

सुशांतच्या सुप्रसिद्ध शुद्ध देशी रोमांस आणि रियाच्या मेरे डॅडी की मारुती या चित्रपटाच्या शूटिंगचे सेट जवळपास होते. तिथेच आपली पहिली भेट झाली आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या फिल्म सेटवर आणि पार्टीत भेटत राहिलो. असं रियाने सांगितलं. आम्ही मित्र झालो आणि आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले, भेटतही होतो पण त्यावेळी सुशांत आधीच रिलेशनशिपमध्ये होता, असं रियाने पोलीस चौकशीत सांगितलं. त्यानंतर आम्ही एकाच प्रॉडक्शन हाऊसपासून वेगळे होऊन स्वतंत्र होण्यासाठी आणि वेगवेगळ्या बॅनरखाली काम करण्याचा निर्णयही घेतला आणि दोघंही रिलेशिपमध्ये आलो, असं रिया म्हणाली.

सुशांतने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही. मात्र त्याच्या आत्महत्येमागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात असून त्यानुसार मुंबई पोलिसांनी सुशांतशी संबंधित अनेकांची चौकशी केली सुरू केली आहे. त्यामध्ये रिया चक्रवर्तीचाही जबाब घेण्यात आला. गुरुवारी १८  जूनला सकाळी ११ वाजता रिया चक्रवर्ती बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता हजर झाली आणि बांद्रा पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान तिनं आपल्या नात्याची कबुली देत अनेक धक्कादायक खुलासे केले.



हेही वाचा

कॉमेडी-ड्रामा 'लूटकेस' या तारखेला होणार प्रदर्शित

Dil Bechara Trailer: सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा