Advertisement

कॉमेडी-ड्रामा 'लूटकेस' या तारखेला होणार प्रदर्शित

कुणाल खेमू स्टारर 'लूटकेस' चित्रपटाची कथा एक मध्यम वर्गीय कुटुंबातील व्यक्तीवर आधारीत आहे.

कॉमेडी-ड्रामा 'लूटकेस' या तारखेला होणार प्रदर्शित
SHARES

फॉक्स स्टार हिंदीचा आगामी चित्रपट 'लूटकेस'ची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट ३१ जुलै २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

कुनाल खेमू स्टारर 'लूटकेस' चित्रपट डिस्ने+ हॉटस्टारवर थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. याची पुष्टी करताना फॉक्स स्टार हिंदीनं आपल्या अधिकृत खात्यावर ट्विट केलं आणि लिहिलं की, "या बॅगमध्ये काहीतरी काळे आहे, हे कोणाचं भविष्य बदलणार आहे का?" ३१ जुलै रोजी 'लूटकेस' पाहा.

कुणाल खेमू स्टारर 'लूटकेस' चित्रपटाची कथा एक मध्यम वर्गीय कुटुंबातील व्यक्तीवर आधारीत आहे. मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या कुणाल खेमूला एक पैशांनी भरलेली सुटकेस सापडते. या सुटकेसमुळे त्याच्या आयुष्यात समस्यांचा डोंगर उभा राहतो. हेच या चित्रपटातून मजेशीर रीत्या मांडण्यात आलं आहे. तो या सर्वांचा कसा सामना करतो? हे चित्रपटातून पाहता येईल.

अभिनेता जावेद जाफरींचा मुलगा मीजान कुणाल खेमूच्या आगामी 'लूटकेस' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे. मंगळवारी या चित्रपटांविषयीची माहिती समोर आली आहे. मीजाननं 'मलाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

चित्रपटात कुणाल खेमू सोबत गजराज राव, रसिका दुग्गल, रणवीर शौरी आणि विजय राज झळकणार आहेत. राजेश कृष्णन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओ आणि सोडा फिल्म प्रॉडक्शन तर्फे याची निर्मिती केली गेली आहे.



हेही वाचा

अभिनेत्री रेखा यांचा बंगला सील, 'हा' व्यक्ती आला पॉझिटिव्ह

Dil Bechara Trailer: सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा